

विधानपरिषद सभागृहात औचित्याच्या मुद्दयाव्दारे केली मागणी
नागपूर : नागपूर जिल्हयात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या खेळांमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असून पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठले नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अश्या सर्व कंपन्यांची चैकशी करून दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आज विधानपरिषद सभागृहात औचित्याच्या मुद्दयाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.
नागपूर शहरातील तसेच खेड्यापाड्यांमध्ये होणा-या लग्न समारंभसह विविध कार्यक्रमांमध्ये त्याद्वारे पाण्याचे वितरण केले जाते परंतु हे पाणी खरोखर शुद्ध आहे का हे पाहणे गरजेचे असून कोणतीही प्रक्रिया न करता हे थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते ही वस्तुस्थिती आहे याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी विक्रीवर फूड सेफ्टी एक अंतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा मार्फत तपासणी करून संबंधित कारखाने व विकणा-यांवर कडक कारवाईची मागणी सातत्याने होत असून युवीस्टरी डायजेशन सूक्ष्म गवळणी व ओझो डायजेशन इत्यादी प्रक्रिया करून हे पाणी किंवा नजारे उपलब्ध व्हावे असे अपेक्षित असते परंतु गल्लोगल्ली याचे कारखाने लावले असून मिनरल वॉटरच्या नावाखाली हे थंड पाणी सर्रास विकले जात आहे. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये 20 ते 60 रुपयापर्यंत विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे. अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रक्षाळेच्या माध्यमात वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वारंवार अन्न व औषधी प्रशासन विभाग वैद्य मापन शास्त्र विभाग आरोग्य विभागाकडे होत असणे परंतु याची गंभीर दखल प्रशासन घेत नाही, असा आरोपही आमदार प्रकाश गजभिये यंानी केला.