

वसई: वसईतील मायक्रो न्यूमॅटिक कंपनीमधील धडक कामगार युनियनच्या युनिटचे आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थित युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. कोरोना त्रिसूत्री चे पालन करून कार्यक्रम यशस्वी रित्या पारपडला. यावेळी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात कामगार नेते अभिजीत राणे व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी युनिटचे अध्यक्ष दीपक पारेख, सचिव निलेश शहा, खजिनदार रविना बाप्टिस्ट यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच युनियनचे उपाध्यक्ष उत्तम कुमार व जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांचा सत्कार युनिट कडून करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पळून युनियनचे वसई-विरार उपाध्यक्ष दीपक शर्मा, वसई-विरार सचिव उदय शेट्टी, पत्रकार बी के पांडे, शेमल आजगीय आदी पदाधिकारी उपस्थित होते.

