

(ठाणे दि.19) :- ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व अवलंबिताना सूचीत करण्यात येते की, COVID-19 कोरोना महामारीने मार्च -2020 पासून आजतागायत बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास zswo_thane@maharashtra.gov.in या मेल आयडीवर खालील नमुन्यानुसार पाठवावी.
सैन्य क्रमांक, रँक, मा. सैनिकाचे नांव, बाधित / उपचारार्थ दाखल असलेल्याचे नांव, पत्ता, भ्रमणध्वनी, हॉस्पिटलचे नांव व भरती दिनांक, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिनांक, सध्या उपचार घेत असल्यास हॉस्पिटलचे नांव व सद्यस्थिती.
याव्यतिरिक्त ज्या माजी सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने किंवा शासनाच्या तात्पुरत्या सेवेत भाग घेतला असल्यास त्यांनी आपली सर्व माहिती या कार्यालयास वरील मेल आयडीवर पाठवून द्यावी, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे व पालघर यांनी केले आहे.