

सर्वसामान्यांच्या नेहमीच पाठीशी उभ्या असणाऱ्या बहुजन विकास आघाडीने आज पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या आणीबाणीत वसई विरारकरांच्या पाठीशी उभे राहून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या घोषवाक्याला सार्थक सिद्ध केले. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नवघर माणिकपूर विभागातील विशाल नगर, शास्त्री नगर भागात उन्मळून पडलेल्या झाडांना हटविण्यात जाहिरातींच्या होल्डींगमुळे महावितरणास अडथळा येत होता आणि यामुळेच सदर विभागात मागील ३ दिवसापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून माजी महापौर नारायण मानकर, माजी सभापती उमा पाटील, विशाल नगर रेसीडेंशल असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर पवार, माजी नगरसेवक रवींद्र मांजरेकर, प्रकाश जाधव, वसई संस्कृती चे सल्लागार/संपादक अशोक वाघमारे, हाजी पटेल, शेखर महागांवकर, साईराज पवार व विशालनगर-शास्त्रीनगर मधील नागरिक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या सहा.आयुक्त मनाली शिंदे यांना जाहिरातीच्या होर्डिंग्ज मुळे अग्निशमन दलास झाडे तोडताना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. परंतु होर्डिंग्जची मंजुरी ही मुख्यालयतून मिळत असल्याकारणाने मुख्यालय स्थानिक पातळीला विश्वासात न घेता नियोजन करीत असल्यामुळे ह्या घटना घडत असल्याचे त्यांनी प्रसंगी स्पष्ट केले. परंतु उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता विभागातील अडथळे ठरणारे सर्व होर्डिंग्ज २ दिवसांत काढून टकून देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले. तरी प्रसंगी बहुजन विकास आघाडीने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळेच मागील ३ दिवसांपासून खंडीत असलेला वीजपुरवठा पुर्ववत सुरळीत सुरू झाला.