

वसई(प्रतिनिधी)- तोक्ते वादळाने वसई तालुक्यात किनाऱ्यापट्टीवर खूप नुकसान केले आहे. परंतु या वादळा खाली मनपा सज्ज असल्याचे बोलले जात होते.परंतु आपत्कालीन यंत्रणेला फोलपणा चव्हाट्यावर आता असल्याचा प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर भाजपाचे युवा मोर्चाचे वसई विरार शहर जिल्हा सचिव प्रतीक चौधरी यांनी टीका केली आहे.या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.
वसई विरार महानगरपालिका ची कागदावर दिसणारी आपत्कालीन यंत्रणा जमिनीवरून गायब असल्याचे जनतेत प्रचंड नाराजगी असून माजी नगरसेवक नॉट रीचेबल आहेत. वॉर्ड क्रमांक 108 मध्ये आनंदी भवानी मंदिरा पासून ते थेट रानगाव रोड पर्यंत परिसरातील स्थानिक वसईकर जनता सलग दिवस अंधारात असून अजूनही लाईटचे खांब घरांवर कोसळलेल्या स्थितीतच आहेत.जामदार आळी तेथे तर चक्क नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला परंतु सुदैवाने तेथिल जागृक नागरिकमुळे शासकीय यंत्रणा च्या उदासीनत्यामुळे होणारी जीवित हानी टाळली केंद्र व राज्य सरकारकडून वाऱ्यावर सोडणे हेच मनपाचे आद्य कर्तव्य आहे का असाही प्रश्न प्रतीक चौधरी यांनी उपस्थित केला आहे. सर्व भोंगळ कारभारामुळे वसई-विरारची जनता त्रस्त झाली आहे.आणि का वाऱ्यावर सोडण्यात आले याचाही जाब विचारत आहे.

