
वसई तालुक्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सध्यस्थिती पाहता राज्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान माजवले असून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यातच अचानक आलेल्या चक्री वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली आहेत, त्यामुळे अनेक घरांचे कौल-पत्रे तुटली आहेत, भिंती कोसळलेल्या आहेत, शेतकरीवर्गाने पावसाळ्यासाठी ठेवलेले जनावरांचे वैरण भिजून गेले आहे, वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मच्छिमार बांधवानांचे ही वादळामूळे नुकसान झाले आहे. ताळेबंदीच्या काळात अनेकजण बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

त्याचबरोबर अचानक आलेल्या चक्रीवादळाने सदर लोकांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांच्यावर या परिस्थितीत चा मानसिक ताण आला आहे. आपण प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करून झालेल्या नुकसानाचे स्थळपंचनामे करून नुकसानग्रस्थांना भरपाई देवून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे वसई पूर्व मंडळ अध्यक्ष अश्विन सावरकर यांनी वसई तहसीलदार यांना केली आहे.