
गट विकास अधिकारी भरत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योजना यांची चौकशी करा….

वसई (प्रतिनिधी) :कोरोना लसीकरण मोहीम राज्य सरकारने हाती घेतली असून या लसीकरणात अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचे उघड झाले आहे. कोरोना लसीकरणाबाबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एक कागदपत्र युवा शक्ती एक्सप्रेसच्या हाती लागले असून त्यात ४०० च्या ठिकाणी ३५० लसी दिल्या जात आहेत. ५० लसी काढून घेतल्या जात आहेत. हा सर्व काय प्रकार आहे याची सखोल चौकशी व्हावी व सदर प्रकरणी गट विकास अधिकारी भरत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योजना यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
कोरोना लसीकरण प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. नियमांचे पालन केले जात नाही. समजा ५०० लसी पुरवायच्या असतील तर त्यातून ५० लसी काढून ४५० लसी पुरविल्या जातात.
सदर भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसने केली असून सदर प्रकरणी मुख्यमंत्री व तमाम संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या आहेत.