

वसई विरार शहर महानगरपालिकेने नालासोपारा आणि वसई पश्चिम परिसरातील सांडपाणी ज्या खाडीत सोडले जाते ती सोपारा खाडी अंदाजे ७०० ते ८०० मीटर लांबीपर्यंत माती भराव पर्यावरण विभागाची कोणतेही परवानगी न घेता बुजवली आणि जो सांडपाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे महानगरपालिकेने तयार केला तो योग्य नसून तो सुरळीत करावा असे तत्कालीन आयुक्त श्री लोखंडे आणि आताचे आयुक्त श्री पवार यांना वारंवार भेट घेऊन लेखी स्वरूपात देण्यात आले परंतु या गंभीर गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले .
निरी आणि आय आय टी या संस्थेने देखील पान क्रमांक २१/२२ वर सदर मार्ग योग्य नसून त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास पर्याप्त नाही २०१९ पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी योग्य मार्ग करण्यात यावा अशी सूचना या संस्थेने महानगरपालिकेला केल्या आहेत परंतु महानगरपालिका गंभीर नसून स्वतःच बांधलेले मैदान कोणी बांधले असे आदेश आयुक्तांनी काढले आहे . आम्ही मैदानाच्या विरोधात नसून केंद्र सरकारच्या अधिकारात असलेली खाडी आणि परिसर ज्या अधिकारी वर्ग यांनी केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता माती भराव केला अशा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचे निलंबन करून झोपलेल्या महानगरपालिकेला जागे करण्यासाठी घंटा वाजवा आंदोलन वसई विरार शहर महानगरपालिका कार्यालय वसई पश्चिम येथे करण्यात आले त्यावेळी माजी जिल्हाप्रमुख श्री शिरीष चव्हाण, निलेश तेंडोलकर, मिलिंद खानविलकर, विवेक पाटील, प्रवीण मप्रोलकर राजा बाबर , मिलिंद चव्हाण , संजय गुरव, सुधाकर रेडकर , जसीथा फिनच, शैला हटकर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते