

पावसाळी वातावरण व जोराचा वारा सुटलेला असल्यामुळे त्यांनी जाळ्यासकट कासव आपल्या होडीत टाकुन किनार्यावर आणले.
आणि संवर्धन मोहीम केळवेचे योगेश पालेकर यांना कळवले.
पालेकर यांनी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे प्रथमेश प्रभुतेंडोलकर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
दरम्यान स्थानिक मच्छीमारांनी जाळे कापुन कासवाची सुटका केली.प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी व्हिडीओ काॅल करून तज्ञांचे मार्गदर्शन घेतले असता
कासवाचा पुढच्या दिशेचा उजवा पाय नव्हता शिवाय कासवाला श्वासोच्छवास करण्यास त्रास होत होता असे लक्षात आले.
स्थानिक मच्छिमार दिनेश तांडेल, देवेश तांडेल,हरेश्वर तांडेल यांनी वनविभागाच्या मिना शंखफाळे यांच्या मदतीने कासवाला पुढील उपचारासाठी डहाणू येथे पाठवले.