

वसई (प्रतिनिधी) : पोलीस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, रतन टाटांशी संबंध असल्याच्या मारत होता बाता police arrested Fake police cop आरोपीनं त्याचं खोटं ओळखपत्र देखिल तयार केलं होते. ते दाखवून तो अनेक लोकांना धमक्या देण्याचं, फसवण्याचं किंवा ठगण्याचं काम करत होता.मुंबई, 29 मे : पोलीस बनून लोकांची फसवणूक करणारा आणि लुटणाऱ्या भामट्याला (Duplicate Police) वसईच्या (Vasai) माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलं आहे. प्रत्यक्षात पालिकेचा ठेकेदार असलेला हा व्यक्ती लोकांना पोलीस असल्याचं सांगून त्यांची फसवणूक करत होता. काही लोकांना त्यानं लुटलंही होतं. विशेष म्हणजे स्वतःच्या वर्गमैत्रिणीला त्यानं पोलीस असल्याचं सांगून लुटलं. त्यांनंतर पीडितेनं तक्रार केल्यानं माणिकपूर पोलिसांनी (Manikpur Police) कारवाई करत आरोपीला अटक केली.पोरस विराफ जोखी असं या भामट्याचं नाव आहे. पोरस हा महानगर पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं महानगर पालिकेमध्ये कामाचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं सर्वांना सांगितलं. त्यानंतर त्यानं त्याच्या ओळखीच्या अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत त्यानं अनेकांना गुंतवणूक करायला लावली. गुंतवणूक करणाऱ्यांनी काही दिवसांनी जेव्हा पैसे मागितले तेव्हा पोरस यानं सर्वांना धमक्या द्यायला सुरुवात केली. त्याने फसवलेल्या लोकांना पोलिस असल्याचं सांगून शांत राहण्याची धमकी दिली.