

इतर मनपा पेक्षा वविशमनपा मधे लसीकरण कमी
– वसई विरार शहर महानगरपालिका यांची लसीकरण मोहीम इतर मनपा यांच्या तुलनेत अत्यंत संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास येते. १३१ दिवसात दीड लाख नागरिकांनी लस टोचून घेतल्याचे मनपा ने सांगितले आहे.एकूण १,६०,१०० लसीचे डोस वसई विरार शहर महानगरपालिका यांना प्राप्त झाला. Covishield १,४७,८०० व Covaxin १२,३०० डोस आले.
४५-६० वयोगट
पहिला डोस (४२१२६)
दुसरा डोस (६१६०)
६०+ वयोगट
पहिला डोस (४७१२९)
दुसरा डोस (१४५०७)
१८-४४ वयोगट
पहिला डोस (६८०९)
दुसरा डोस (०)
हेल्थ केअर वर्कर
पहिला डोस (१०८०६)
दुसरा डोस (८७२६)
फ्रंट लाईन वर्कर
पहिला डोस (९८७६)
दुसरा डोस (४०८५)
Covishield चे १,४१,९१४ डोस संपले व Covaxin चे ८३०१ डोस संपले, आलेले डोस व संपलेले डोस यांचा पडताळा केला असता Covishield चे ५८८६ डोस शिल्लक आहेत परंतु मनपा शिल्लक ८००० डोस दाखवत आहेत. (२११४ डोस कमी आहेत) आणि Covaxin चे ३९९९ डोस शिल्लक आहेत परंतु
मनपा शिल्लक १५०० डोस दाखवत आहेत (२४९९ डोस जास्त आहेत) यात लसीकरण केंद्रावरील लसीचा आकडा नसल्याने ही तफावत असू शकते. आधी वसई विरार शहर महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक लसीकरण केंद्रावरील लसींचा आकडा जाहीर करत असत परंतु गेल्या दोन प्रेस नोट मधे लसीकरण केंद्रावरील लसींचा आकडा देत नसल्याने लसीचे डोस वाया तर गेले नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. आपल्या शेजारी असलेल्या मिरा भाईंदर मनपा चे २३.९०% लसीकरण झाले आहे तेच आपल्या मनपा चे केवळ ७.५% लसीकरण झाले आहे. Covishield च दोन डोस मधील कालावधी वाढवला मुळे लसीकरण केंद्रावर होणारी दुसऱ्या डोस संबंधित गर्दी कमी झाली आहे. Covaxin बाबत देखील अशीच परिस्थिती उद्भवत असल्याचे दिसत असून नागरिकांमध्ये Covaxin दोन डोस मधील अंतर बाबत संभ्रम निर्माण झाला आहे हा संभ्रम लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील मनपा लस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढत आहेत तिथे आपली मनपा काय करतेय याचा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अंबरनाथ , बदलापूर नगरपालिका, ठाणे,मुंबई,नवी मुंबई मनपा लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद करत असल्याचे दिसत असताना आपली वसई विरार शहर महानगरपालिका अशा प्रकारे लस खरेदीसाठी निविदा का काढत नाही याचा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अधिक माहिती घेतली असता प्रभारी आयुक्त श्री सतीश लोखंडे साहेब यांनी लस उपलब्ध झाली तर करू असे खोचक उत्तर मिळते पणं लस खरेदीकरिता निधी उपलब्ध आहे/नाही याची माहिती देण्यास टाळटाळ करत आहेत. लस उपलब्ध होत नसल्याचे कारण देत प्रशासन लसीकरण केंद्र वाढवत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. गृह संकुल, सोसायटी, खासगी कारखाने यांच्या जागेत जाऊन लसीकरण करण्यासाठी इतर महानगर पालिकेने नियमावली जाहीर केली असताना आपली वसई विरार शहर महानगरपालिका अशी नियमावली का लागू करत नाही जेणे करुन इतर मनपा क्षेत्रातील रुग्णालयांना आपल्या मनपा क्षेत्रात लसीकरण करण्यासाठी मुभा उपलब्ध होईल.
११ मे २०२१ रोजी आमची वसई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वसई विरार शहर महानगरपालिका मधील तब्बल ३५०+ गृह संकुल, चाळ,सोसायटी यांनी सोसायटी अवरात लसीकरण सुरू करा अशी मागणी केली आहे अद्याप याबाबत आयुक्त व जिल्हाधिकारी मौन बाळगून आहेत. लसीकरण मोहीम अतिजलद व सुरक्षित करण्यासाठी लवकरात लवकर गृह संकुल चाळ येथे लसीकरण सुरू करावे अस जनता या प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. कशा प्रकारे लसीकरण व्हावे यासाठी आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी प्रभारी आयुक्त श्री सतीश लोखंडे साहेब यांना सूचना केल्या आहेत. जिल्हा आपती कायद्यांतर्गत प्रत्येक खासगी रुग्णालयातील एक – दोन परिचारिका व वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर संघटना यांच्या साहाय्याने प्रत्येक गृह संकुल, चाळ,सोसायटी मधे छोटे छोटे गट पाडून लसीकरण मोहीम सुरू करावी जेणेकरुन जलदगतीने लसीकरण होण्यास मदत होईल व लस डोस वाया जाण्याचे प्रमाण शून्य राहील.