पालघर दि 31 : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे, २०२० ते ऑगस्ट, २०२० या महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने (गहू रु.८/- प्रतिकिलो व तांदूळ रु.१२/- प्रतिकिलो) प्रतिमाह प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरीत करण्यात आले. यापैकी शिल्लक राहिलेले धान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आहिरे यांनी कळविले आहे*
त्याअनुषंगाने मा. सहसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक: अधापु २०२१/प्र.क्र. २९/नापु-२२, दिनांक: २५ मे, २०२१ अन्वये माहे मे, २०२० ते ऑगस्ट, २०२० या कालावधीत वाटप करून शिल्लक राहिलेल्या अन्नधान्यातून जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये तसेच रास्तभाव धान्य दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून, २०२१ करीता सवलतीच्या दराने (गहू रु. ८/- प्रतिकिलो व तांदूळ रु.१२/- प्रतिकिलो) वितरीत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *