
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना युवक आघाडी संघटनेची मागणी

सध्या राज्यभरात कोरोना विषाणूने घातले आहे. सर्व राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण भेटत आहेत. कोरोना विषाणू मुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्वच पोलिस कर्मचारी लोकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होण्याची मोठी भीती आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शंभर बेड असलेले covid-19 सेंटर उभारण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना युवक आघाडीने केली आहे.
पोलीस अधिकारी – कर्मचारी 24 तास ड्युटी करत असून अशा स्थितीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य करत असताना त्यांना कुठेतरी कोरोनाची लागण होईल अशी त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती तयार करत आहे. राज्यातील भीषण परिस्थिती बघता बेड न मिळणे ऑक्सिजन न मिळणे त्यामुळे अनेक रुग्ण दगावत असल्याने ही दहशत त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे जर ड्युटीवर असताना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना कोणत्याही सदस्याला संसर्ग झाल्यास त्यासाठी पालघर जिल्ह्यात 100 बेड असेल आणि त्यामध्ये रेमिडीसिवर वर आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन साठा असेल
असे स्वतंत्र सुसज्ज covid-19 सेंटर पालघर जिल्ह्यामध्ये उघडण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना युवक आघाडीने केली आहे.