माननीय आमदार हितेंद्र ठाकुर साहेब व युवा आमदार मा. क्षितीज ठाकुरजी यांच्या मदतीने आज बुधवार दि.०२ जून २०२१ पासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मित्तल क्लब हाऊस येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. वेळ सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत – एकूण १०० डोस रोज असणार .
नागरीकांची गैरसोय व लसीकरणाचे महत्व लक्षात घेता प्रभाग समिती जी चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी प्रभाग समिती “जी” अंतर्गत १) मित्तल क्लब हाऊस, परेरा नगर २) जिल्हा परिषद शाळा, बापाणे ३) गोविंदशेट पाटील हॉल, ससुनवघर ४) ज्ञानोदय हायस्कूल चिंचोटी ५) जिल्हा परिषद शाळा, कामण ६) इंम्पेरियल हायस्कूल, सातीवली ७) ओमसाई हायस्कूल, गिदराईपाडा ८) विद्या विकासीनी स्कूल, फादरवाडी ९) सेंट रॉक चर्च गोखीवरे १०) निरंकारी हॉल, वालीव या *१० नविन ठिकाणी तात्काळ कोरोना लसीकरण केंद्र करणेची मागणी प्रभाग समिती जी चे माजी सभापती कन्हैया भोईर यांच्या मार्फत जावक क्र.१९१ व १९५/२०२१-२२ दि.२२/०४/२०२१ तथा दि.२६/०४/२०२१ व जावक क्र.२०१/२०२१-२२ दि.१२/०५/२०२१ या पत्रान्वये महानगरपालिका आयुक्त तथा आरोग्य विभागास पत्राव्दारे करण्यात आलेली होती. १८ वर्षांवरील युवा वर्गाचे लसीकरण रखडल्याने त्यांच्यातही नाराजीचा सुर आहे. त्यामुळे शासन निर्देशानुसार त्यांचे लसीकरण सुरू झाल्यास या वाढीव लसीकरण केंद्रांचा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
तरी जास्तीत जास्त लाभार्थी नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी सकाळी लवकर जाऊन टोकन घ्यावे, केंद्रावरील नियमांचे पालन करावे व गोंधळ न करता महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही विनंती सर्वाना समाजसेवक धरेंद्र कुलकर्णी यांनी केली .
या लसीकरण सरुकरतांना या वेळी नायगाव पुर्व मधुन युवाशक्ती व स्नेहा फाऊंडेशनच्या अध्यक्षा कर्मविर स्नेहा जावळे व बहुजन विकास आघाडीची टिम विकास महाडिक , युवा कार्यकर्ता चेतन घरत , सौ श्रद्धा चेतन घरत , जयेश म्हात्रे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *