
सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही.
रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे असा निर्णय घेतला आहे याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या
तसेच आता कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात या निर्णयामुळे त्याला आळा बसेल असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.