



वसई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण दगावले.या वेळी मनाला चटका लावणारी घटना घडली. या घटनेने डॉ.अजीजुर रहमान याना अंतबाह्य हादरून टाकले. एक 23 वर्षीय गरीब तरुण आपल्या आई वडिलांना घेऊन कोळीवड्यात आला त्यांची प्रकृती खालावत असंल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यासाठी पाया पकडू लागला त्यांनी फार प्रयत्न केले पण अतिदक्षता विभागात बेड नसल्याने सर्वांनी त्यांना नाकारले त्याक्षणी डॉक्टरांनी निर्णय घेतला की गरीब गरजू लोकांसाठी कोळीवड्यात कोरोना सेंटर उभारावे ही माहिती त्यांनी डॉक्टर अब्दुल रहमान यांनी दिली यासाठी लगेचच तयार झाले. दोघांनी मौलाना सुबहान यांना ही कल्पना सांगितली व हुजैफा शाळेचे संस्थापक अध्यक्ष एजाज सर यांच्याकडे शाळेत कोरोना सेंटर चालू करण्यासाठी परवानगी मागितली शाळेचे संस्थापक एका पायावर तयार झाले सेंटर सुरू करण्यासाठी किमान दहा लाख रुपये लागणार म्हणून निधी कसा उभा करावा यासाठी कोळीवाडा येथे दानशूर व्यक्तीची बैठक घेतली .पहिल्याच बैठकीत 2 लाख 25 हजार रुपये जमले.या निधी मुळे कार्यकर्ता मध्ये उत्साह वाढला व दुसरी बैठक लगेचच घेण्यात आली.25 बेड कसे मिळवायचेच त्यासाठी निधी कुठून उभारायचा या बाबतीत चर्चा करण्यात आली.मात्र निधी जमा होत नव्हता.त्यामुळे निरुत्साह निर्माण झाला. यादरम्यान कोळीवाडाचे मुस्लीम कमिटीचे अध्यक्ष मुस्तफा भाई यांनी आपले मित्र प्रशांत देशमुख व सुनील आचोळकर याना फोन लावून 25 बेड कोरोना सेंटरसाठी पाहिजे असल्याची माहिती त्यांना दिली. प्रशांत देशमुख यांनी दहा मिनिटांत रुद्र फाऊंडेशन चे मार्गदर्शक सुनील आचोळकर यांची संमती घेऊन 25 बेड आम्ही दान करू असे सांगितले तर मात्र कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावर आनंद पसरला मनपाच्या आनंद परवानगी साठी माजी नगरसेवक अफिफ शेख यांनी डॉक्टर अजिजूर रहिमान डॉ.अब्दुल रहमान मुस्तफा भाई व अंजुम पटेल भाई यांची बैठक घेतली.आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मध्यस्थीने परवानगी घेऊन कोरोना सेंटर चे उदघाटन माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचे हस्ते केले. अशा रीतीने आजही संकट समयी एकमेकांवर विश्वास ठेवला तर कोणताही काम अशक्य नाही.