
वसई (प्रतिनिधी) : वसईच्या तहसीलदार उज्वला भगत या खाजगी ईको कारमधून प्रवास करीत असल्याचे पहावयास मिळते. त्यांच्या सरकारी गाडीचे काय झाले? त्यांचा चालक ही खाजगी आहे. त्याचा पगार कोण देतो?
तहसीलदार हे पद मोठे पद आहे. त्यामुळे या पदाचा थाट ही तसाच असतो. वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांना सरकारी गाडी होती. मात्र मागील ७-८ महिन्यांपासून ती कार कुठे दिसत नाही. तहसीलदार उज्वला भगत या सध्या मारुती ईको या गाडीमधून फिरतात व त्यांचा चालक ही खाजगी आहे.
वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्या विरुद्ध वृत्तपत्रांमध्ये सध्या फारच बातम्या येत आहेत. तहसीलदार उज्वला भगत यांना भाड्याने दिलेल्या सदनिकेमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजचोरी पकडून दोन दिवसात १,६०,०००/- चे देयक भरण्यास सांगितले आहे. दोन दिवसात देयक न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. दोन दिवसापासून सदर बाबत बातम्या वृत्त पत्रांमध्ये /प्रसार माध्यमांमध्ये झळकत असून सदर बातमीमुळे तहसीलदार उज्वला भगत यांची सर्वत्र ठिकाणी चर्चा आहे.
