
प्रा.जयंत वानखडे यांनी द मराठी प्रेस अँड दलित मोमेंट इन महाराष्ट्र, 1920-1994 हा पीएचडी प्रबंध यावर्षी मुंबई विद्यापीठात सादर केला, त्यांनी प्राध्यापक डॉ .संदेश वाघ अध्यक्ष इतिहास व पुरातत्वशास्त्र अभ्यास मंडळ मुंबई तसेच तसेच प्राध्यापक मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रबंधाची परिपूर्ती केली
दिनांक 9 जून 2021 रोजी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सोनाली पेडणेकर या पीएचडी मौखिक परीक्षेच्या अध्यक्ष होत्या या मौखिक परीक्षेत बहिस्त परीक्षक डॉ दत्तात्रय वाघ अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे होते. प्राध्यापक जयंत वानखडे यांच्या 450 पानांचा प्रबंधात एकंदर 6 प्रकरणे आहेत. मौखिक परीक्षेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ सोनाली पेडणेकर यांनी प्राध्यापक जयंत वानखडे यांचे संबंधित लिखाण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादित केले. डॉ दत्तात्रय वाघ यांनी सदर प्रबंधात महाराष्ट्रातील आंबेडकरी आंदोलनात मराठी वृत्तपत्रे कशाप्रकारे प्रतिबिंबित झाली याचा विस्तृत आढावा प्राध्यापक जयंत वानखडे यांनी घेतला आहे असे प्रतिपादित केले
डॉ संतोष बनसोड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती , डॉ श्याम कोरेटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर डॉ. किसन अंबाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे सर्व महाराष्ट्रातील विविध इतिहास अभ्यास मंडळातील अध्यक्ष उपस्थित होते. मुंबई विद्यापीठ ,इतिहास व पुरातत्वशास्त्र अभ्यास मंडळाचे पुढील विविध सदस्य मौखिक परीक्षेत उपस्थित होते. डॉ प्राचार्य सुधाकर लहू पंचांग, डॉ विकास मेहेंदळे , डॉ. सुरेश पाथरकर, डॉ रूपाली मोकाशी आदी मंडळी उपस्थित होते
प्रा बाबासाहेब दूधभाते इतिहास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठातील व इतर विद्यापीठातील विविध प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सदर ऑनलाइन मौखिक परीक्षेस उपस्थित होते. डॉ संतोष बनसोड यांनी डॉ संदेश वाघ तसेच जयंत वानखेडे यांचे अभिनंदन केले डॉ वाघ यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की अवघ्या सहा वर्षाच्या कालखंडात डॉक्टर वाघ यांच्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना एम फिल, पी एच डी पदव्या प्राप्त झाल्या आहेत.47संदर्भ ग्रंथ व 100 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झाले आहे. फ्रान्स,जर्मनी, इटली ,दुबई ,नेपाळ, श्रीलंका ,मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर, इटली, इंडोनेशिया आदी 15देशात त्यांची दहा संदर्भ ग्रंथ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत तसेच इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टरिकल रिसर्च च्या पश्चिम भारताच्या समन्वयक पदावर त्यांनी काम केले आहे. जयंत वानखेडे यांच्या 450 पानांच्या प्रबंधात एकंदर सहा प्रकरणे आहेत त्यात महाराष्ट्रातील 1920 ते 1994 या कालखंडात आंबेडकरी चळवळीचे कशा पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. आंबेडकर कालीन व आंबेडकरोत्तर कालखंडातील आंबेडकरी चळवळ याचा आढावा संशोधकांनी घेतला आहे. सदर विषयातील संशोधकाकरिता हा प्रबंध अत्यंत महत्वपूर्ण असा दस्तावेज आहे