प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार यांना शासनाने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकेत होत असलेल्या वीज चोरीचे १,६०,०००/- देयक अखेर भरले. त्यामुळे आता महावितरण कंपनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करणार नाही. मात्र सदर प्रकरणात महावितरण कंपनीला गुन्हा दाखल करायला पाहिजे होते ?
वसईतील पापडी येथील आत्मशांती अपार्टमेंट या इमारतीत सरकारने वसईच्या तहसीलदार यांच्याकरिता भाडे तत्वावर सदनिका दिलेली असून या सदनिकेत तहसीलदार रहात नाहीत. या ठिकाणी पुरवठा विभागातील एक लिपिक रहातो. त्याच सदनिकेला लागून दुसऱ्या सदनिकेमध्ये उप विभागीय अधिकारी कार्यालयायील खाजगी महिला राहतात. या दोन्ही सदनिकात मिळून एकच विद्युत मिटर असून जवळपास २ वर्षांपूवी वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सदरचे वीज देयक न भरता चोरून वीज घेण्याचा उद्योग यांनी सुरू केला. अखेर दोन दिवसापूर्वी महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश माधवी व सहाय्यक अभियंता जयंत काकुळते यांनी ही वीज चोरी पकडून १,६०,०००/- चे देयक सदनिका मालकाला दिले. सदरचे देयक २ दिवसात न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. अखेर सदरचे देयक भरण्यात आले. देयक भरल्यामुळे आता सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश माधवी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सदर प्रकरणी गुन्हा दाखल व्हायलाच हवा होता.
मागील २ वर्षांपासून सदर सदनिकेमध्ये वीज चोरी होत होती. ज्यावेळी मिटर काढून घेतला त्यानंतर या मिटरचे देयक भरले जात नसल्याची बाब मागील २ वर्षे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कशी आली नाही? त्यामुळे सदर वीजचोरीबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी.

युवा शक्ती एक्सप्रेसचा दणका :

सदर वीजचोरीचे प्रकरण युवा शक्ती एक्सप्रेसने शोधून काढून आवाज उठविला. सदर प्रकरण प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले आणि प्रचंड चर्चिले गेले.
वसई तहसीलदार उज्वला भगत या इको गाडीने प्रवास करतात, या संदर्भात युवा शक्ती एक्सप्रेसने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तहसीलदार उज्वला भगत यांनी इको कार बदलली व दुसऱ्या गाडीमधून कार्यालयात आल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *