

श्री क्षेत्र माकुणसार खाडिवरील सफाळे- केळवे – पालघर ह्यांना जोडणारा राज्य महामार्गावरील पुल अनेकवेळा दुरुस्ती करुन सुद्धा अवजड वाहनांसाठी बंद असल्याचे निदर्शनास आणून नविन पुलाचा प्रस्ताव मंजूर करुन लवकरात लवकर बांधकाम सुरु करण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेकडून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननिय श्री. चंद्रकांत दादा पाटिल ह्याना अर्जाद्वारे सुचित करण्यात आले.
त्याचप्रमाणे केळवे गाव पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला येत असताना केळवेरोड स्थानकाला पर्यटन स्थानकाचा दर्जा देण्याबाबत मार्च २०१८ मधे केलेल्या मागणीचे स्मरणपत्र राज्याचे पर्यटनआणि रोजगार हमी मंत्री श्री जयकुमार रावल ह्यांना देण्यात आले.