

प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी वसई शहर मंडळ उपाध्यक्ष देवेंद्र पावसकर यांच्यातर्फे नेत्र चिकित्सा शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला होता.
रविवार दि. १३ /०६/२०२१ रोजी वसई शहर मंडळ उपाध्यक्ष श्री. देवेंद्र पावसकर यांनी डी.आर आॅप्टीक्स , तामतलाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले. सदर आयोजनास वसई शहर मंडळ अध्यक्ष श्री सचिनजी परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. नेत्र (डोळे) हे ज्ञानेंद्रिय असल्याने नियमीतपणे नेत्र तपासणी महत्वाची आहे, या भूमिकेतून वसई मंडळ सरचिटणीस श्री. अमित पवार यांनी नागरिकांना सदर शिबीराचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले होते.
सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. तसनीफ नूर शेख उर्फ राजा भाई यांनी विशेष मेहनत घेतली.
काॅम्युटर मशिनद्वारा नेत्र तपासणी शिबीराचा अनेक सर्वसामान्य,गरीब गरजू व्यक्तींनी लाभ घेतला.
सदर सामाजिक उपक्रमात वसई शहर मंडळ महिला अध्यक्ष सौ. अभिलाषा वर्तक, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस श्री. प्रतिक चौधरी, सहकार सेल मंडळ संयोजक श्री देवेंद्र नाईक सहभागी होते.