मिरा भाईंदर/ठाणे (प्रतिनिधी) –
मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येला निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत, मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशन वर नेमक्या काय अडचणी आहेत, MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी सविस्तर पणे चर्चा करून समजून घेतल्या. दररोज येणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्युम वरील फ्लकच्युएशन, प्रेशर मधील फरक, पाण्याचे फिल्टरेशन, शटडाऊनची कारणे, पाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि अन्य महत्वाच्या विषयावर सविस्तर उहापोह केला गेला.

माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने साकेत येथे कुठलीही पूर्व सूचना न देता कार्यरत पाहणी केली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष लीलाताई पाटील, नगरसेविका रुबिना फिरोज, मर्लिन डीसा, गीता परदेशी, माजी नगरसेवक फरीद कुरेशी, मिरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे व ओवळा माजीवडा युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल काटकर उपस्थित होते.

MIDC कडून येणार पाणी शहरात व्यवस्थित येत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजप पक्षाची आहे, महापौर, उपमहापौर यांची आहे. केवळ महानगरपालिका भवनात बसून सगळी काम होत नसतात. सत्ताधाऱ्यांना लोकहितासाठी चेंबर मधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करणं गरजेचं आहे. मात्र मिरा भाईंदर शहराच्या दुर्दैवाने सत्ताधारी सध्या केवळ आपसी हेवेदावे सांभाळण्यात मग्न आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सुयोग्य पाणी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *