वसई , दि . १४ ( प्रतिनिधी):
वसईतील जेष्ठ काँग्रेस नेते व बसिन कॉथॉलिक बँकेचे माजी अध्यक्ष स्व. मायकल फुटयार्डो यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १७ जून २०२१ रोजी आण्णासाहेब वर्तक सभागृह वसई काँग्रेस भवन पारनाका येथे करण्यात आले आहे . वसई – विरार शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सदर शिबीर होणार आहे . यासंदर्भात वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे , महाराष्ट्र भर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सुरू आहे. ह्या संकटामध्ये सापडलेल्या सगळ्यांसाठी आपण आपला एक मदतीचा हात पुढे करायचा आहे. ही मदत आपण सगळे रक्तदान करून करायची आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व इच्छुकांनी आपली नावे खाली दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावीत ह्या रक्तदान शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही ह्याची दक्षता घेतली जाणार आहे. प्रति तास चार व्यक्ती रक्तदान करणार आहेत . हे रक्तदान टोकन सिस्टीम ने होणार आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस मास्क लावणे सक्तीचे आहे. ज्या व्यक्तीला सर्दी , खोकला , ताप आहे त्यांनी या शिबिरामध्ये सामील होऊ नये असे कळविण्यात आले आहे. संपर्कसाठी पदाधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर –
कुलदीप वर्तक ( ७७१९०००००५) , डॉ.जॉय रॉड्रीग्ज (७४९९९७४६७८) ,
अमोल परेरा (७७०९९४७६७७), रोल्यांड लोपीस (८३२९०५१५०२),
सुजय खैरे (७५०७९७१७४९), संदीप कनोजिया (८४५९२४९२७३), अनिकेत पाटील (८८८८४४५८५८) , प्रतीक वर्तक (९८९०५३४३३६), क्रिस्टल नाडर (९०२९४४७९९८), फेलिक्स पागे (७७७३९३४७४२) सुनील खोवाल यांच्या संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *