वसई, प्रतिनिधी : गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या संततधारेमुळे वसई विरार नालासोपारा येथे शहरी भागातील सखल भागात पाणी साचल्यामूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अतिवृष्टीमुळे नालासोपारा शहरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे झालेल्या मालमत्तेचे नुकसान व झालेली गैरसोय दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना त्वरीत करता येतील जेणेकरून पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन शहरात नागरीकांना पूरपरीस्थीतीला सामोरे जावे लागणार नाही याबाबत आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे पालघर जिल्हा लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी शहरात पाहणी दौरा केला.विरार व नालासोपारा शहरात त्यांनी वसई विरार महानगर पालिकेच्या अभीयंते व अधिका-यांसोबत पाहणी करून योग्य त्या ठिकाणी महत्वाच्या सुचना केल्या.
वसई-विरार व नालासोपारा शहरात अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही.त्यामूळे नागरीकांच्या मालमत्तेसह वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसत असतो.नालासोपारा पूर्व आचोळे येथील जया पॅलेस येथे विभागातील समस्यांची माहिती व निवेदन शिवसेना शहर प्रमुख प्रदिप सावंत,युवासेना विधानसभा अधिकारी रोहन चव्हाण यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने खासदार गावीत यांना देण्यात आले. यावेळी जिल्हासंघटक किरण चेंदवणकर,शिव वाहतूक सेना उपजिल्हा संघटक विनायक निकम,उपजिल्हाप्रमुख श्री.प्रविण म्हाप्रळकर,नवीन दुबे, पंकज देशमुख, सुरेंद्र सिंह, भरत देवघरे, मलर वणन, कुषेश्वर शर्मा, विनोद पार्टे तसेच महिला आघाडी विभाग संघटक दिपाली राणे,उप विभागसंघटक अनिता शिवकर व अनेक युवा सैनिक,शिवसैनिक,नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *