
प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयात सेतूमध्ये नागरिकांची लूट चालू आहे. शिधापत्रिका व अन्य कामांकारिता अवाच्या सवा मनमानी पैसे घेतले जातात. त्याची पावती दिली जात नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तमाम प्रकारचे दाखले, शिधापत्रिकांकरिता शासनाने सेतू विभागाची स्थापना केली आहे. सेतू विभाग हे ठेका पद्धतीने दिले जातात. ठेकेदारांनी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणेच नागरिकांकडून संबंधित कामाकरिता पैसे घ्यायला हवेत. मात्र वसई तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागात मनमानी पद्धतीने लोकांकडून पैसे घेतले जातात. शिवाय त्याची पावती ही दिली जात नाही.
तहसीलदार उज्वला भगत यांनी सेतू विभागात कोणत्या दाखल्याकरिता किती रक्कम अदा केली जावी व किती दिवसात सदर दाखला दिला जाईल याबाबतचा माहिती फलक लावावा. तसेच लोकांकडून स्वीकारलेल्या पैशाच्या पावत्या दिल्या जाव्यात, असे आदेश सेतूच्या ठेकेदाराला द्यावेत. लोकांची लूट थांबवावी.