
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत व सातत्याने बांधकामे होताच आहेत. सदरची अनधिकृत बांधकामे अर्थातच मंत्री, अधिकारी व लोक प्रतिनिधींच्या संरक्षणात झालेली आहेत व होत आहेत. नियमानुसार ठेका अभियंत्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई व एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करायची असते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे ठेका अभियंत्यांना काम करावे लागते.
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत व सातत्याने होतच आहेत. अनधिकृत बांधकामांना मंत्री, अधिकारी, लोक प्रतिनिधी या सर्वांचे संरक्षण लाभलेले आहे. वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग समित्यांमध्ये अतिक्रमण विभाग असून या विभागांमध्ये ठेका अभियंता आहेत. या ठेका अभियंत्यांना नियुक्ती पत्र देताना अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे तसेच अनधिकृत बांधकामांबाबत येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करून दैनंदिन अहवाल सादर करावा. अनधिकृत बांधकाम धारकांवर एमआरटीपी कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती कारवाई करणे, शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेरीवाले, दैनंदिन बाजार यांच्यावर पोलिस संरक्षण घेऊन दंडात्मक कारवाई करणे, वरील नमूद कामांचा दैनिक अहवाल सादर करणे अशी कामे नमूद असताना ठेका अभियंता आपले कर्तव्य बजावताना दिसत नाहीत. ठेका अभियंत्यांनी कर्तव्य न बजावल्यामुळे प्रचंड अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ठेका अभियंत्यांनी कर्तव्याचे पालन न केल्याप्रकरणी आयुक्तांनी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.