
मुंबई (प्रतीक कांबळे) – वंचित बहुजन आघाडी तर्फे आद.प्रका श तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेलं महागाई विरोधी आंदोलन कुर्ला तालुक्याच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कुर्ला रेल्वे स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले या आंदोलना मधे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध आणि निषेध करण्यात आले पेट्रोल,डिझेल,गॅस,तेल,डाळ इत्यादी अनेक जिवनावश्यक वस्तू दर वाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढ कमी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात उग्र असे आंदोलन करु अस कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी सरकारला आव्हान केले या वेळेस मा.सुधाकर कांबळे महिला तालुका संध्या पगारे, मालती वाघ, वार्ड अध्यक्ष,कविता जाधव,सचिन जाधव,शशिकांत मोरे,किरण कांबळे,भिमराव शिंगारे आणि समिर साळवी,राजेश साळवे,किरण हिरवे,डि.के जाधव,पंकज भारतीय,अनिल म्हस्के,अरविंद पवार,अफजल शेख,आनंद ढिपे,राहुल लिहणार,शिरिष पवार,पद्माकर कदम,अजय कदम,जिवन गुरचळ,रोहित बोदडे,किरण झाल्टे,अमन बोदडे,अक्षय गुरचड,सिद्धांत वानखेडे,तालु्क्यातील अनेक कार्यकर्त्यां उपस्थित होते.