या आरटीआय कार्यकर्त्याने वसई-विरारमधील अनेक बांधकाम व्यवसायिकांना आर टी आय चा वापर करून नाहक त्रास दिलेला असून लवकरच त्याची पोलखोल करण्यात येणार आहे.

पदाचा गैरवापर करून आपल्याच कार्यकर्त्यांना अडचणीत आणणे आणि पोलिसांशी संगनमत करून कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे अशा प्रकारचे माझ्यावर करण्यात आलेले आरोप निखालस खोटे असून संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षांचा अनागोंदी कारभार यातून स्पष्ट होतो.

नालासोपाऱ्यातील सामान्य वकुबाच्या एका खंडणीखोर कार्यकर्त्याच्या कलाने सध्या संघटनेचा कारभार हाकला जात असून या आर टी आय कार्यकर्त्याला खुश ठेवण्यासाठी मला जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलेले आहे. संघटनेमधील कार्यकर्त्यात वाढणारी माझी लोकप्रियता सहन न झाल्याने असूयेपोटी या खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष यांचे कान भरल्याचे स्पष्ट आहे.

संघटनेचे नेतृत्व या आरटीआय कार्यकर्त्याच्या पूर्ण आहारी गेले असून त्याच्या भूलथापांवर डोळे मिटून विश्वास टाकला जात आहे. सदरचा आरटीआय कार्यकर्ता अत्यंत थापाड्या व अहंकारी असून शासकीय अधिकारी व पोलीस यांना कस्पटासमान लेखण्याची त्याची वृत्ती आहे.

प्रत्यक्ष पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. गौरव सिंग ह्यांच्याबरोबर उद्धट वर्तन करून त्यांच्याविरोधात या सामान्य वकुबाच्या माणसाने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नरीमन पॉइंट येथे खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सदर प्रकरणी मी प्रमुख साक्षीदार असल्याकारणाने माझा जाब जबाब घेण्यात आलेला होता. माझ्या जबाबावरून प्राधिकरणाच्या नेमलेल्या निवृत्त न्यायाधीशांनी या आरटीआय कार्यकर्त्याला चांगलेच फैलावर घेतले. याप्रकरणी दुपारी तीन नंतर अंतिम सुनावणी ठेवण्यात आलेली असताना हा आरटीआय कार्यकर्ता कारवाईला घाबरून पळपुटेपणा करून तेथून पळून गेला आणि विरार येथील संघटनेच्या कार्यालयात येऊन प्रदेश उपाध्यक्ष यांचे कान भरले.

स्वतःच्या हिमतीवर दावा लढण्याची कुवत नसलेला आणि स्वतःकडे कायद्याची कोणतीही पदवी नसताना स्वतःला कायदेशीर सल्लागार म्हणून सर्वत्र सादर करणारा हा बोगस वकील असून सध्या संघटनेचा कायदेविषयक सल्लागार म्हणून त्याला डोक्यावर बसवण्यात आलेले आहे. प्रदेश उपाध्यक्ष सध्या या सामान्य वकुबाच्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पीत आहेत.

माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान मी या अतिसामान्य खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्याला देत आहे. माझ्यामुळे अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांना त्याने समोर आणावे आणि त्यांची नावे जाहीर करावीत. अन्यथा लवकरच मी या सर्व प्रकरणाचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणार आहे.

या तोकड्या बुद्धीच्या आरटीआय कार्यकर्त्याने माझे आव्हान स्वीकारून दाखवावे आणि राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या नरिमन पॉइंट येथील न्यायालयातून पृष्ठभागाला पाय लावून पळपुटेपणा का केला याचा देखील जाहीर खुलासा करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *