वसई(प्रज्योत मोरे) – वसई विरार महानगर पालिकेच्या कामचुकार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या चांगलीच गाजत असताना येथील विद्युत विभागाने देखील कामचुकरपणाचा कळस गाठल्याची घटना पालिकेच्या वसई प्रभागात (आय) विभागात दिसून येत आहे वसई तहसीलदार कचेरी समोरील रस्त्यावरील एलिडीची शोभिवंत लाईट महिना झाला तरी चालू करण्यास पालिकेच्या विद्युत विभागाला सवड मिळत नाही हा भाग सरकारी कार्यालयाचा असून येथे रात्रीच्या सुमारास अंधार पसरलेला असतो ही लाईट चालू करावी म्हणून वीज विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगितले आहे मात्र आज उद्या सुरू करतो असे सांगून कामचुकार पणा सध्या सुरू झालेला आहे या भागात अंधार पसरलेला असल्याने या ठिकाणी महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत मात्र मनपाच्या या वीज विभागाने गेंडयाचे कातडी परिधान केली असल्याने त्याना हे काम करण्याची आठवण पडत नाही
16 मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादलात अनेक झाडे विजेचे खांब कोसळले होते. वसईच्या प्रभाग आय मध्ये तहसीलदार कचेरी समोरील रस्त्यावर देखील एक भले मोठे झाड पडले होते तसेच 4 विजेचे खांब कोसळले होते या नैसर्गिक आपत्ती नंतर तुटलेले झाड आणि लाईटचे पडलेले खांब दूर करण्यास पालिकेचा एकही अधिकारी फिरकला नाही शेवटी सदरचे पडलेले झाड सिद्धार्थ नगर मधील ग्रामस्थांनी श्रमदानातून दूर केले. या पडझडीमुळे परिसरात चार दिवस लाईट नव्हती अखेर ग्रामस्थांच्या मदतीने घरगुती वीज चालू करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले मात्र याच रस्त्यावर मनपाने शोभेची एलईडी आणि हॅलोजन चे खांब उभे केले आहेत या विजेला कोणताही धक्का बसला नव्हता मात्र तरीही एखादी वायर तुटून ही लाईट बंद झाली आहे. वास्तविक हा भाग रहदारीचा आहे तसेच कोर्ट, पंचायत समिती, तहसीलदार कचेरी, बांधकाम विभाग, वसई किल्ला, प्रांत कार्यालय,वसई पोलीस स्टेशन असे शासकीय कार्यालय या रस्त्यावर आहेत तसेच अनेक छोटे मोठया वसाहती परिसरात आहेत त्याच बरोबर ज्या ठिकाणी हे विजेचे पोल उभे आहेत त्या पोल खाली डिव्हायडर आहेत. विजे अभावी सध्या या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी रोज अपघात होत आहेत या बाबत मनपाच्या विद्युत विभागाला अनेकदा या लाईट चालू करण्या बाबत कळविण्यात आले आहे मात्र या भागात काम करणारा अनिल नामक अधिकारी मागील 40 दिवसापासून ही लाईट चालू करण्याचे आश्वासन देत आहे. इतक्या मोठ्या कालावधी पासून हा भाग अंधारात ठेवणाऱ्या या विभागावर सध्या चौफेर टीका होत आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या या अधिकाऱ्यांना एखादा मोठा अपघात झाल्यावर लाईट चालू करण्याची शुद्ध येईल की काय असे वाटू लागले आहे. मनपाच्या विद्युत विभागाचा किती कामचुकार पणा चाललाय अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *