
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोलघर येथे आज कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा कृषी अधिकारी श्री.बबन मनवे, गटविकास अधिकारी डॉ. दिप्ती देशमुख, सभापती पंचायत समिती श्री.प्रमोद ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती चित्राताई पाटील, सरपंच श्रीमती रुपाली शिर्के, ग्रुप ग्रामपंचायत ताडवागळे उपसरपंच श्री.शैलेश पाटील, कोलघर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेन्द्र पाटील, शासकीय आश्रमशाळा अधीक्षिका माधुरी लोखंडे, चंद्रकांत काळे, मिलिंद पाटील, आर. एच.पाटील,सचिन जुईकर, प्रज्ञा मोरे, श्री.तिवरे, श्रीमती.म्हात्रे, शासकीय आश्रमशाळा कोलघर चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत ताडवागळे ग्रामसेवक व सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.