
तहसीलदारांनी प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्यात. त्यांचा ढिग करू नये.. विनायक खर्डे (अध्यक्ष- स्वराज्य मावळा प्रतिष्टान)
युसुफ अली हा पत्रकार आहे तो गुन्हेगार नाही. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे हा गुन्हा असेल तर गंभीर गुन्हेगार मोकाट का?
वसई: पत्रकार युसूफ अली हे वसई विरार शहरात शोध पत्रकरीता करत असल्याने त्याच्याकडे स्वाभाविकच भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी वर्गाचे पुरावे असणारच. निर्भीड निःपक्षपाती पत्रकारिता करत असतांना काही लाचार व दलाल पत्रकार आपलं दुकान चालण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे काल तहसील कार्यलयात घडलेल्या प्रकाराने सिध्द होते. सामान्य माणसाची साधी तक्रार घेण्यासाठी दिवसभर रखडवून ठेवणारे पोलीस प्रशासन याबाबतीत दबावाला बळी पडून कर्तव्यत्तपरता दाखवून गुन्हे दाखल करण्याचे काम यथायोग्य पार पाडतात. मग हिच तत्परता सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायांच्या वेळी का दाखवत नाहीत? सिव्हिल मॅटर म्हणून का हात झटकतात? हे या वसई विरार शहराचे विदारक सत्य आहे. अशा प्रकारे पोलिस प्रशासन पत्रकार हा समाजकंटक असल्या प्रमाणे सूड उगवताना दिसत आहेत.
आज युसुफ अली यांनी वसई विरार शहरातील करोना पीडित व्यक्तीना हॉस्पिटलकडून लावण्यात आलेल्या भरमसाठ बिलांचा पर्दाफाश करून मनपा प्रशासनाला अशा हॉस्पिटलच्या भ्रष्ट कारभाराचे ऑडिट करून अधिक आकरलेली रक्कम परत करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे अनेक सामाजिक समस्या परखडपणे मांडणारे पत्रकार एक व्यवसाय म्हणून पत्रकारिता न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतांना त्याच्यवर सूडबुद्धीने जो कोणी प्रकार केला असेल त्याची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी वसई विरार शहरातील समस्त पत्रकार व सामाजिक संघटना करत आहेत. युसुफ अली तुम्ही आपल्या पत्रकारितेत पारदर्शक दाखवल्याने आम्ही स्वराज्य मावळा प्रतिष्ठान तर्फे तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जाहिर निषेध करतो.