बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शासन निर्णयान्वये मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भीय पत्रकानुसार वृक्षांची “जोपासना हीच निसर्गाची उपासना ” या योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री. संजय पांढरकामे , वनपाल बी टी पवार तळा, एस सी धायगुडे वनपाल माणगांव, कल्पना गायकवाड वनरक्षक माणगांव, एन एम कामत, एम आर मुढे आणि टीम यांच्या उत्तम नियोजनातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात रोपांचे वाटप, वृक्षारोपण तथा वृक्ष लागवड, मार्गदर्शन आणि संवर्धन करण्याची कामगिरी हाती घेतली आहे.
उपरोक्त योजनेच्या माध्यमातून शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंद वृक्ष , आनंद वृक्ष, माहेरची साडी, स्मृती वृक्ष या नव संकल्पनेवर आधारित १ जुलै २०२१ रोजी अर्थात महाराष्ट्र कृषी दिन आणि हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून माणगांव व तळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात रोप वाटप, वृक्ष लागवड आणि वृक्ष जोपासना तथा संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामस्थ, युवक, युवती, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत कोविड १९ पार्श्वभूमीवरील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन तळा तालुक्यातील ग्रामपंचायत निगुडशेत कार्यक्षेत्रातील गाव महागाव, वाशी, ग्रामपंचायत वांजळोशी कार्यक्षेत्रातील गाव चोरवली, वांजळोशी, माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रातील गाव बोरघर, ग्रामपंचायत पन्हळघर खुर्द , ग्रामपंचायत पन्हळघर बुद्रुक, ग्रामपंचायत वारक कार्यक्षेत्रातील गाव वारक आणि विघवली या ठिकाणी करण्यात आले होते.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे नियोजन माणगांव तालुक्यातील उपरोक्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गाव या नंतर तळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उपरोल्लेखित गावात नियोजनबद्ध पद्धतीने करून सदर कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून सन्मान पुर्वक गुलाब पुष आणि विविध प्रकारची फळ झाडे आणि वनस्पतींची दर्जेदार रोपे देऊन करण्यात आले.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव चे कर्तव्य दक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री संजय पांढरकामे, माणगांव वनपाल एस सी धायगुडे, तळा वनपाल बी टी पवार, वनरक्षक कल्पना गायकवाड, कामत आणि मुढे यांच्या प्रमुख उपस्थितीतील सदर नियोजनबद्ध कार्यक्रमातील माणगांव तालुक्याच्या पेण तर्फे तळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बोरघर गावातील कार्यक्रमाला ग्रामपंचायत पेण तर्फे तळे च्या सरपंच रसिका कळंबे, बोरघर गावचे अध्यक्ष सुभाष मोहे, उपाध्यक्ष पत्रकार विश्वास गायकवाड, शाहिर राजाराम जाधव, रामदास जाधव, दिलीप कळंबे तसेच बोरघर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माणगांव तालुक्यातील पन्हळघर खुर्द आणि बुद्रुक ग्रामपंचायत कार्यक्रमाला सरपंच सुजाता जाधव,वारक येथील कार्यक्रमाला सरपंच संगिता शेकुंडे व ग्रामस्थ उपस्थित होते, तर तळा तालुक्यातील कार्यक्रमाला तळा पंचायत समितीच्या सभापती अक्षरा कदम, गटविकास अधिकारी व्ही बी यादव, तालुका कृषी अधिकारी वाडकर, विस्तार अधिकारी कानेकर, पंचायत समिती सदस्य देवकी लासे, रविंद्र मांडवकर उपसरपंच निगुडशेत, ग्रामपंचायत वांजळोशी सरपंच एस एस सोलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम अंतर्गत कन्या समृद्धी च्या माध्यमातून ३४० रोपे व १९३ अशी एकूण ५३३ रोपांचे वितरण करण्यात आले.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *