
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरून आंबेडकरी समाज आक्रमक

अट्रोसिटी कायद्याबाबत बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वसई विरार मध्ये रिपाईच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले..अट्रोसिटीच्या गुन्ह्यापासून मुक्तता हवी असल्यास त्यांवर दरोड्याचे गुन्हे नोंदवा असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते.
एका लोकप्रतिनिधीने हे भाष्य करणे उचित नसून त्यांचे हे वक्तव्य अट्रोसिटी कायद्याची चेष्टा करणारे तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याने वसई विरार मधील आंबेडकरी समाज एकवटला होता. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथे हे आंदोलन करण्यात आले. या जातीवाचक केलेल्या वक्तव्याबाबत आमदारांनी क्षमा नाही मागितली तर पालघर जिल्ह्यात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनी दिला आहे. आमदारांना केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आमदारांना जसाच तसे उत्तर देऊ असे बहुजन पॅंथरचे अध्यक्ष किर्तीराज लोखंडे म्हणाले. संजय गायकवाड यांचे वक्यव्य आमदार पदाला शोभनीय नाही त्यामुळे आली संजय गायकवाड जाहीरपणे निषेध करतो यापुढे संजय गायकवाड यांच्या कृत्याबद्दल त्यांची पक्षातुन हकालपट्टी करावी असे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष लवेश लोखंडे यांनी मागणी केले . या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन उबाळे ,जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जाधव ,सुवर्णा जगताप, भीमशक्तीचे सुधीर खैरे , संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मनोज रुके , बसपाचे जिल्हा संघटक प्रा. डि.एन. खरे, रिपाइ आठवले गटाचे उदय तांबे, मेहुल मोने ,राष्ट्रीय रिपब्लिकन बहुजन पँथर संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड , अमर जगताप, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव तायडे,वंचित बहुजन आघाडीचे समीर मोहिते, आत्माराम जाधव ,अमित खैरे,पंचशिल युवक मंडळाचे हेमंत गायकवाड , शैलेश गायकवाड, विशाल खैरे, मनोज जाधव, विजया रुके , देवताताई जाधव ,सुनिता देशपांडे , बिपीन रुके, विकास पवार,आयुब माजगावकर ,अमर साळवे, विकास मोरे, राहुल जाधव, मनोज खाडे व तमाम आंबेडकरी पक्ष व संघटनांचे विविध पदाधिकारी या आंदोलनात आक्रमकपणे उपस्थित होते.