
नालासोपारा(प्रज्योत मोरे)- दि.5 जुलै2021 रोजी जेष्ठ समाजसेवक आणि पोलीस बॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. प्रतापजी दुपारे यांच्या कार्यालयात उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली.या संस्थेचे संस्थापक मा.केतन जोशी हे आहेत मा. केतन जोशी हे समाजसेवक असून ते अनेक वर्षे समाजोपयोगी कामे करतात.त्यांनी गेल्या व याही लोकडाऊन मध्ये गरजू व गरीब जनतेला अनेक वेळा स्वखर्चाने धान्य वाटप केले आहे. हे असे सामाजिक कामे करताना काही मर्यादा येत होत्या म्ह्णून त्यांनी उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे. येथून पुढे या ट्रस्ट च्या माध्यमातून मोठ्या जोमाने समाज उपयोगी कामे करून समाजसेवा करण्यात येईल।असे माहिती केतन जोशी यांनी दिली, या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून मा.प्रतापजी दुपारे हे उपस्थित होते या ठिकाणी ट्रस्टच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन भविष्याबद्द्ल मार्गदर्शन केले.तसेच युवा समाजसेवक तेजस दुपारे यांनीही मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात सूत्रसंचालन व मार्गदर्शन वरीष्ठ पत्रकार/समाजसेवक प्रज्योत मोरे यांनी केले. या कार्यक्रमात गरजू जनतेला विविध प्रकारचे आवश्यक धान्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास हरीश भुई, लख्या बिरादार सिंग दडीयाल(टिन्नू)रवींद्र भोसले, राजू लोखंडे व करणं दुपारे हे मान्यवर उपस्थित राहून त्यांनी उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट आणि केतन जोशी यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले.
