
माणगांव ( विश्वास गायकवाड ) आपल्या समाज व्यवस्थे मध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष सर्व डॉक्टर मंडळी शासनाच्या कोविड निर्मुलन कार्यात शासनाच्या बरोबरीने अहोरात्र अहर्निशपणे कोरोना संकटाशी निकराने लढा देत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशाला आणि देशातील तमाम जनतेला डॉक्टरांच्या वैद्यकीय मौलिक योगदानाबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रकर्षाने महत्त्व पटलेले आहे.
शासनाच्या कोविड निर्मुलन कार्यात कोरोना संकटाशी अहोरात्र अहर्निशपणे लढा देणाऱ्या या डॉक्टरांच्या फौजे मधील सुवर्णाक्षरात लिहावे असे एक नाव म्हणजे डॉक्टर गीतांजली प्रकाश गायकवाड या मुळच्या रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावच्या शारदा बळीराम गायकवाड यांच्या सुनबाई अर्थात प्रकाश बळीराम गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी, प्रकाश गायकवाड हे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या बांधकाम विभागात मध्ये नोकरी करत असल्याने ते त्यांच्या परिवारासह मिरा भाईंदर मध्ये गेली अनेक वर्षे राहतात. त्यांची पत्नी डॉक्टर गीतांजली या व्यवसायाने डॉक्टर असून यांनी कोविड – 19 या जागतिक महामारीच्या अतिशय कठीण काळात गेली दीड वर्ष आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता आपला जीव आपले कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात घालून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय औषधोपचार व आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी आपल्या सुखी चैनी जीवनशैलीचा त्याग करून गेली दीड वर्ष अहोरात्र अहर्निशपणे पुर्ण वेळ रुग्ण सेवेला स्वतः ला वाहून घेतले आहे. डॉक्टर गीतांजली प्रकाश गायकवाड या मोठ्या धैर्याने, निष्ठेने, प्रामाणिकपणे व अतिशय जबाबदारीने आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर न करता आपल्या देशासाठी किंबहुना देशातील जनतेच्या आरोग्यसेवे साठी एका योद्याप्रमाने अहोरात्र अहर्निशपणे कर्तव्य बजावले त्यास तोड नाही. त्यांनी कोविड 19 साथीच्या काळात केलेला त्याग व समर्पण आणि बजावलेल्या कर्तव्याबद्दल तसेच मानवता व सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून दिलेल्या वैद्यकीय आरोग्य सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त करून मिरा भाईंदर मेडिकल असोसिएशन आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून मिरा भाईंदर महानगर पालिकेेचे सन्माननीय आयुक्त श्री. दिलीप ढोले साहेब यांचे हस्ते त्यांना सन्मान पूर्वक कोविड योध्दा म्हणून सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन मोठ्या अभिमानाने गौरविण्यात आले.
या वेळी मिरा भाईंदर महानगर पालिकेतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या मध्ये प्रामुख्याने मिरा भाईंदरचे माननीय खासदार श्री. राजनजी विचारे साहेब, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे मा. अतिरीक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, मा. उप आयुक्त (मुख्यालय) श्री. मारूती गायकवाड, मा. उप आयुक्त (आरोग्य) श्री. संजय शिंदे, मा. शहर अभियंता श्री. शिवाजी बारकुंड,मा. कार्यकारी अभियंता श्री. दिपक खांबित, मा. प्रमुख वैद्यकीय अधिकारी श्री. प्रकाश जाधव, मिरा भाईंदर मेडीकल असोसिएशनचे मा. प्रेसिडेन्ट श्री. अनुज गर्ग यांची उपस्थिती लाभली होती.