
मनपा चे रात्रपाळीचे कर्मचारी यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता अंदाजे 25 व 30 हजार च्या आसपास भंगार म्हणून विकले


प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती आय हद्दीतील पाचू बंदर येथील स्मशानभूमीतून ५ शेगड्या परस्पर बेकायदेशीर विकल्या गेल्याचे वृत्त असून सदर बाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती आय हद्दीतील पाचू बंदर येथील स्मशानभूमीत ५ जुन्या शेगड्या होत्या. सदर शेगड्यांच्या ठिकाणी नवीन शेगड्या खरेदी केल्या गेल्या. जुन्या शेगड्या विक्रीबाबत महानगरपालिकेचे नियम असणारच. कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकताना वा खरेदी करताना त्याचे नियम पाळावे लागतात. पाचू बंदर येथील स्मशानभूमीतून शेगड्या बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या असून सदर बाबत सहाय्यक आयुक्तांनी सखोल निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
.