पालघर दि. 06 :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास शासन विभाग शासन निर्णय क्र. मलोदि-2013/प्रक्र.11/मक/दिनांक : 04/0/2013 अन्वये जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन हा दि.19/07/2021 जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
महिला लोकशाही दिनाचा अर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशून असावा तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र. व तहसिलदारांच्या उत्तराची प्रत अर्जा सोबत जोडण्यात यावी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसाच्या अगोदर अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मातोश्री बंगला, आर्यन ग्राउंड च्या शेजारी विष्णू नगर रोड, लोकमान्य पाडा, पालघर ई-मेल dwcdopalghar@gmail.com फोन नं. 02525-257622 यांच्याकडे आवश्यक त्या कागद पत्राच्या पुराव्यासह सादर करावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *