
वसई(प्रतिनिधी) – वसई विरार व आजूबाजूच्या परिसरात समाजाचे प्रश्न व समाजाला न्याय देण्यासाठी सदैव तप्तर असणारे पत्रकार हे जीवावर उद्धार होऊन पत्रकारिता करीत आहेत.अश्या पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ व पत्रकारांना न्याय देण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. पत्रकारांना अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यांच्यावर हल्ले सुद्धा होतात.त्यांना अपमानित करण्यात येते अश्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचे हे संघटन काम करणार असून पत्रकाराना एक हक्काचे ठिकाण युनिटी मीडिया प्रेस क्लब यांच्या मार्फत देण्यात येईल तसेच युनिटी मीडिया प्रेस क्लब चे अध्यक्ष पदी रुबिना मुल्ला आणि उपाध्यक्ष पदी प्रज्योत मोरे तसेच लवकरच पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे युनिटी मीडिया प्रेस क्लब चे उपाध्यक्ष प्रज्योत मोरे यांनी सांगितले.
रुबिना मुल्ला प्रज्योत मोरे