
नालासोपारा(प्रज्योत मोरे)- आज दिनांक 11 जुलै 2021 रोजी पँथर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व पोलीस बॉईज असोसिएशनचे धडाडीचे कार्यकर्ते आयु.संजयजी गायकवाड यांचा नागीनदासपाडा येथील कार्यलयात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. कोविडचे वातावरण असंल्या कारणाने मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पोलीस बॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मा.प्रतापजी दुपारे हे उपस्थित होते. त्यानी प्रथम प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात केली, त्यांनीं कार्यक्रमात संजय भाऊच्या गुणगौरव करून मार्गदर्शन केले.युवा नेते मैत्री संस्थेचे वसई विरार जिल्ह्याचे सचिव मा. तेजस दुपारे यांनी सुद्धा मार्गदर्शन व शुभेच्छा या छोटेखाणी कार्यक्रमात पोलीस बॉईज चे विजय गोडबोले विनायक खर्डे रवींद्र भोसले, सुरेश भाई मारु, दिनेश पटेल,राहुल तांबे निखिल उपाध्याय उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्योत मोरे यांनी केले या वेळी संजय गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पुढिल कार्याला सहकार्याचे आव्हान केले.


