पालघर दि. 13 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय दि.09 सप्टेंबर, 2020 नुसार खावटी अनुदान योजना मंजुर करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये लाभार्थ्यांना रुपये 2000 रोख स्वरुपात त्यांच्या बँक खात्यामध्ये व रुपये 2000 अन्नधान्य स्वरुपात वस्तु आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत देण्यात येत आहेत. त्यानुसार डहाणू प्रकल्पाच्या तलासरी पालघर व वसई या चार तालुक्यांचा समावेश असून या प्रकल्पाअंतर्गत 60290 लाभार्थ्यांचे अर्ज अधिनस्त डहाणू, खावटी अनुदानासाठी प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 58832 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटींची पुर्तता करून त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे.

दिनांक 12.07.2021 रोजी पालघर येथील जिल्हा परिषद शाळा वेवूर येथे खावटी अनुदान वाटप योजना अंतर्गत धान्य किटस वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू आशिमा मित्तल, पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्जला काळे, तसेच नगरपालीका सभापती, नगरसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खावटी अनुदानासाठी प्राप्त असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना धान्याचे किटस वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांचे उपस्थित पात्र लाभार्थ्यांना कोविड-19 बाबतचे आवश्यक नियमांचे पालन करून खावटी योजनेच्या धान्याचे किटस् वाटप करण्यात आले. यावेळी श्री. गावित यांनी प्रकल्प अधिकारी यांनी खवटी योजना आदिवासी लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच कोविड-19 मध्ये प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलेल्या कामाचा गौरोद्गार केला. तसेच शासनाने आदिवासी लाभार्थ्यांना खावटी अनुदान वाटप केले. याबाबत सरकारचेही आभार मानले.

या अनुषंगाने कोणीही पात्र लाभार्थी खावटी अनुदानापासून वंचित राहिला असल्यास ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामसेवक, तलाठी, आदिवासी विभागाचा प्रतिनिधी या ग्रामस्तरीय समितीकडे संपर्क साधावा असे आवहान प्रकल्प अधिकारी यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *