

वसई (प्रतिनिधी) अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रातल्या भाजप सरकारने जनतेला महागाईच्या दरीत ढकलून पेट्रोल – डिझेल , घरगुती गॅसचे दर गगनाला भिडवल्याच्या विरोधात वसई , नालासोपारा येथे युवक काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहिमेला वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांच्या हस्ते सुरुवात झाली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कडून राज्यभर पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे .
त्या निमित्ताने वसई येथील पेट्रोल पंप परिसर येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी स्वाक्षरी अभियानाला लोकांनी भरभरून उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच नालासोपारा येथील पेट्रोल पंपावर ही राष्ट्रव्यापी स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली . यामध्ये लोकांचा मोदी सरकार वरील रोष जनतेने व्यक्त केला.
या स्वाक्षरी मोहीमेला वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप कनोजिया , सरचिटणीस सुनील खोवाल , सचिव सुजय खैरे , सचिव अंकिता वर्तक , रायसन डिसूजा , साहिल वाझ , आशितोष दुबे , अंकित दुबे , हें युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निलेश पेंढारी, काँग्रेसचे नेते सुधीर खैरे, रामदास वाघमारे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेला उपस्थिती लावली.