
वसई विरार शहर आणि ग्रामीण भागात अतिशय संथगतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे दुसरी कडे प्रायव्हेट राईड करुण ८५ ० रू उकळून एका दिवसात एक हजार लसीकरण केले जाते. दुसरी कडे सूरू केलेली शासकीय लसीकरण केंद्र महिनमहिने बंद ठेवली जात आहे त्यात मोठ्या प्रमाणात पिवळ्या बेडकानी वशिलेबाजी करुण आपले पितळ पांढरे केले आहे लसीकरण आम्ही करतो असा आव आणून नागरिकांची दिशाभूल करत आहे .स्थानिक लोकनेते आमदार खासदार आणि आयुक्त कुठल्या बिळात लपले आहे ते समजत नाही. म्हणुन या निष्क्रिय ढोगळ कारभार विरोधात भाजप नेते मा.आमदार प्रसाद लाड जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्व खाली दिनांक १६जुलै २०२१रोजी महापालिका मुख्यालात विरार पूर्व कार्यालय समोर सकाळी अकरा वाजता धिक्कार आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व भाजप नियुक्त पदाधिकारी सेल चे अध्यक्ष महिला मोर्चा. युवा मोर्चा ह्यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात आपल्या विभागातील नागरीकांना मोर्च्यात सहभागी करून घ्यायचं आहे.