
प्रतिनिधी : वसईतील पाचू बंदर येथील शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याने भरलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत गोरगरिबांची धान्याची राख झाली. सदर प्रकरणी चौकशी व्हावी.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई तहसील क्षेत्रातील पाचू बंदर येथील शासकीय धान्याच्या गोदामाबाहेर उभ्या असलेल्या धान्याने भरलेल्या ट्रकला आज सकाळी आग लागली. सदर बाबत पत्रकारांना खबर मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी वृत्त संकलना करिता धाव घेतली तर तेथील सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेश द्वार बंद करून घेतले.
सदर प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली की नाही याबाबत काही कळू शकले नाही. पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सदर आगीबाबत चौकशी व्हावी. आग कशी लागली, हा अपघात आहे की घातपात याची चौकशी होण्यासाठी पोलिसात गुन्हा दाखल व्हायला हवा..