
नांदेड ते पनवेल (जी सध्या बंद आहे) ही रेल्वे नांदेड ते वसई सोडण्यात आल्यास बोरीवली ते डहाणू दरम्यान वास्तव्य करणार्या हजारो मराठवाडा निवासी मुंबई व परिसरातील नागरिकांच्या सोईचे होऊ शकेल. याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे उपरोक्त नमूद परिसरांत वास्तव्यातील नागरिकांना मराठवाड्यातील आपल्या मूळ गावी येणे असेल तर दादर किंवा सीएसटीहून रेल्वे प्रवास करावा लागतो. गावी येताना लहान मुलं, वयोवृध्द आणि सोबत लागणारे सामान घेऊन येताना जीवाची दमछाक तर होतच असते शिवाय ते जिकिरीचे व कित्येकदा जीवघेणे सुध्दा ठरले जाते. हा सर्व खटाटोप वाचला जावा आणि त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा अशी माझी व समस्त मुंबई व परिसर मराठवाडा निवासियांची मनोमन इच्छा आहे. ती सर्व प्रवासी मंडळी आपले मतदार नसतीलही परंतु त्यांचे कित्येक आप्तेष्ठ आपले मतदारही असू शकतील. महत्त्वाचे म्हणजे ते बांधव मराठवाडा निवासी म्हणून जर हे महत्त्वपूर्ण काम आपण करुन त्यांना न्याय द्यावा ही माझी व त्यांची विनंती आहे.