
वसई विरार महापालिका आणि ग्रामीण भागात वॅक्सिंन घोटाळा आता जोरात गाजत आहे भाजप च्या आक्रमक पवित्रा नंतर आज वसई शहर मध्ये पाच हजार लस उपलब्ध झाल्या वसई शहर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा अभिलाषा वर्तक यांनी वसई वॅक्सिंन घोटाळा बाबत मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांना कळवून त्या बाबत तत्काळ कारवाई होऊन प्राइवेट राईड प्रमाणे आज डी.एम. पेटिट मध्ये पहिल्यांदा एक हजार डोस उपलब्ध झाले आहेत. कुठेतरी घोटाळा होत आहे हे ह्यावरून सिद्ध होते.८५०रू घेवून नक्की योग्य प्रमाणित डोस दिले जातात का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.? वसई विरार महापालिका वैद्यकीय अधिकारी ह्यांचे प्राइवेट लसीकरण ची प्रमाणित आणि दर्जा सत्यता पडताळून घेण्याची जबाबदारी आहे . त्याची सरप्राइज विजीट करुन सूरू असलेली लसिकरणबरोबर आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे . पश्चिम बंगाल आणि आसाम प्रमाणे बोगस लसीकरण वसईत होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही . ह्या महापालिका आयुक्त नी सतर्क राहून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे वसई सरचिटणीस नंदकुमार महाजन आणि महिला मोर्चा अध्यक्षा अभिलाषा वर्तक यांनी केली आहे.