
मातीच्या अनधिकृत भरावामुळे भरले पाणी ?
प्रतिनिधी :
मालजी पाडा ग्राम पंचायत हद्दीत नैसर्गिक नाला बुजवून गावाचा रस्ता अरुंद करून बेकायदेशीर काम केले जात असल्याप्रकरणी ग्रामस्थांनी हरकत घेत तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासन विकासकाच्या पाठीशी उभे असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. विकासकाने बेकायदेशीरपणे माती भराव केल्यामुळे गावात पावसाचे पाणी भरून मोठे नुकसान झाले आहे. मात्र विकासकाने अधिकाऱ्यांना मैनेज केलेले असल्यामुळे गावकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील मालजी पाडा ग्राम पंचायत हद्दीत मालजी पाडा येथे अनधिकृत बांधकामावरून विकासक व ग्रामस्थांमध्ये जबरदस्त तणाव पेटलेला आहे. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता विकासक संतोष कृष्णा पुत्रण यांनी नैसर्गिक नाला बुजवून रस्ता अरुंद करण्याचे काम चालूच
ठेवल्यामुळे ग्रामस्थ संतापले असून जिल्हाधिकारी, तहसीलदार, वालीव पोलिस स्टेशन यांना तक्रारी दिल्या आहेत.
घटनेचे गांभीर्य पाहून तहसीलदार, पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तहसीलदार, पोलीस यांना विकासकांकडून आर्थिक लाभ होत असल्यामुळे तहसीलदार, पोलिसांची भूमिका विकासकाच्या बाजूने दिसली. पोलीस वाले तर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देताना दिसले. ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी पोलीस देतात. एवढी हिंमत? हा पैशाचा माज असून अधिकाऱ्यांचा माज उतरवावा लागेल.
ग्रामस्थांच्या तक्रारीसंदर्भात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी.