
वसई (प्रतिनिधी) : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामे धुमधडाक्यात चालू आहेत. सदर अनधिकृत बांधकामांमा अर्थातच अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. २०० प्रती फूट प्रमाणे वसुली चालू असून मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचविली जात आहे. लकी कंपाउंड़ व प्राईम इस्टेट येथे लाखो फूट बांधकामे चालू आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिका भ्रष्टाचाराची पंढरी म्हणून राज्यभर गाजत आहे. अंदाधुंद भ्रष्टाचार!
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती जी हद्दीत लकी कंपाउंड़ व प्राईम इस्टेट येथे लाखो फुटाची अनधिकृत बांधकामे चालू असून २०० रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे वसुली करून सदरच्या अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांनी संरक्षण दिलेले आहे. मंत्रालयापर्यंत लाचेचा पैसा पोहोचविण्यात आला आहे. त्यामुळे सदर बांधकामांवर कोणतीही कारवाई होत नाही. लकी कंपाउंड़ व प्राईम इस्टेट परिसरात पप्पू गुप्ता, यासिन पटेल, सोहेल यांची बांधकामे चालू आहेत. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी सदर बांधकामे निष्कासित करून बांधकामधारकांवर एमआरटीपी कायद्याने गुन्हे करावेत.
आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना वसुलीचे टार्गेट दिलेले आहे. अनधिकृत बांधकामांशिवाय वसुली होणे असंभव आहे. त्यामुळे अधिकारी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन बेधडकपणे वसुली करताना दिसतात.
