
पालघर(प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात अत्यंत अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालू असून सदर बाबत सातत्याने तक्रारी करून ही प्रशासनाकडून उचित कारवाई केली जात नसल्याबद्दल व भ्रष्टाचार करीत असल्याबद्दल सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तुफान एक्सप्रेसचे संपादक अनिल भोवड यांनी केली आहे. त्यांनी सदर प्रकरणी मुख्यमंत्री व अन्य संबंधितांना तक्रारी दिल्या असून सदर बाबत योग्य ती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्हा हा भ्रष्टाचाराचे आगार म्हणून नावारूपाला आलेला असून येथील अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी व निर्ढावलेले असे आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक प्रकरणांबाबत अनिल भोवड यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रारी दिल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, लोकायुक्त, महा संचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना पाठविलेल्या ईमेलनुसार त्यांनी आतापर्यंत १९०० हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या तक्रारींमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. यांच्या तक्रारींवर कारवाई करावी तर अवैध धंदे करणाऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार, त्यामुळे करावे तरी काय अशा कात्रीत प्रशासन अड़कले आहे. अनिल भोवड यांच्या तक्रारींचा धडाका काही बंद होत नाही. प्रशासनाला कारवाई करावीच लागेल, अशी कोंडी त्यांनी केली आहे.