
वृक्षारोपण ,वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांचे सोबत केक कापून व विधवा आदिवासीं महीलाना धान्य वाटप करून खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी आपला वाढदिवस साजरा केला
पालघर 24 जुलै :आज खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांचा वाढदिवस ,करोना व कोकणातील पूर स्थिती लक्षात घेता माझा वाढदिवस आपण साजरा करू नये अशी विनंती खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी आपल्या च्याह त्यांना केली
तरी अनेक चाहते खासदार श्री राजेंद्र गावित साहेबांना शुभेच्छा देत होते.
वाढदिवसाच्या दिवशी साहेबांनी वृक्षारोपण केले व जनतेला वृक्षारोपण करण्याची आव्हान केले , करोना मुळे मानवाला ऑक्सिजनची किती गरज आहे हे सर्वाना समजलेला आहे.
झाडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रित्या ऑक्सिजन हवेत देत असतात .
तसेच झाडांमुळे सृष्टीचे संतुलनही नीट राहते.
म्हणून प्रत्येकाने झाडे लावा असे खासदार राजेंद्र गावित साहेब म्हणाले.
पालघर येथे वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाने सोबत केक कापून त्यांच्यासमवेत वेळ घालून आपला वाढदिवस साजरा केला. तेव्हा त्यांनी आपल्या आईची आठवण काढली, माझी आई असती तर मला वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद दिला असता. पण तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात माझ्या आई समान आहात आपला आशीर्वाद मला मोलाचा आहे.
वृद्धाश्रमातील वृद्धांनी गाणी गाऊन व खासदारांना ओवाळून त्यांचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक बांधिलकी म्हणून कमारे येथील 50 पेक्षा जास्त विधवा आदिवासी महिलांना एक महिना पुरेल एवढे धान्य वाढदिवसानिमित्त खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी वाटप केले .
त्यांच्यासोबत पालघर लोकसभा शिवसेनेचे सहसमन्वयक केदार काळे त्यांचा मुलगा रोहित गावित व इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या वाढदिवसाला डामडौल न करता सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्य जनतेसोबत वाढदिवस साजरा करणारा खासदार हाआगळा वेगळाच खासदार आहे अशी भावना जनतेमध्ये आहे.