
वसई, (प्रतिनिधी) : सुरेश निकुंभ सर यांच्या पापडी येथील थॉमस बँप्सिस्टा हायस्कूल मध्ये 33 वर्षाच्या ज्ञान तपसेतून हजारो विद्यार्थी घडवले. त्या विद्याथ्यांमध्ये काही डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, उद्योजक, वकील, फादर तसेच बिशप अशा उच्च पदावर आहेत या विद्याथ्यांमध्ये काही परदेशातही नोकरी-व्यवसाय करत आहेत. अशा निकुंभ सरांचे आयुष्य कसे घडले याचा मागोवा घेणारे त्यांचे आत्मचरित्र ‘मी कसा घडलो’ याचे प्रकाशन नुकताच जगविख्यात विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते मुंबई येथे झाले. यावेळी निकुंभ सरांचे विद्यार्थी जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष समाजसेवक विजय वैती व सावी दिवाळी अंकाचे संपादक रमाकांत घुमटेकर उपस्थित होते.